मुंबई
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात (Accident of Travels) झाला आहे. या ट्रॅव्हल्समधून एकूण 54 वारकरी प्रवास (Warkari Bus Accident) करत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ ही खासगी बस एका ट्रॅक्टरला आदळली आणि थेट दरीत कोसळली. रात्री एक वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. अपघातात काही जण जखमी झाले असून त्या सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेमध्ये घेसर गावातील 70 वर्षाच्या हंसाबाई पाटील, नावाळी गावातील 65 वर्षीय रामदास मुकादम आणि नारीवली गावातील 70 वर्षीय गुरुनाथ पाटील या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. या बस मध्ये असलेले घेसर गावातील प्रत्यक्षदर्शी दयानंद भोईर म्हणाले,अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाजवळ दवाखाना जवळ होता म्हणून ताबडतोब बसमधील प्रवाशांना नेण्यात आले.निळजे पाडा-घेसर येथील भाविकांचा मुंबई – पुणे एप्रेस हायवेवर रात्री पंढरपूर ला जाताना निळजे पाडा घेसर गावातील भाविकांचा पनवेल पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.