8.5 C
New York

Aashadi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्य वारकऱ्यांची ‘नवसाक्षरता अभियान दिंडी’

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

आषाढी एकादशी (Aashadi Ekadashi) निमित्त डोंबिवलीतील (Dombivli) स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात (Swami Vivekanand Vidyamandir) ‘नवसाक्षरता अभियान दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचे पोशाखात सहभागी झाल्या होत्या. या अभियाना अंतर्गत साक्षरता, जलसाक्षरता, पर्यावरण साक्षरता, वृक्ष, ग्रंथ दिंडी चे आयोजन शाळेच्या परिसरात करण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णूनगर प्राथ. शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना राठोड यांच्या मार्गदर्शनाने नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत, साक्षरता, जलसाक्षरता, पर्यावरण साक्षरता, वृक्ष, ग्रंथ दिंडी चे आयोजन शाळेच्या परिसरात करण्यात आले. शाळेतील सफाई कर्मचारी, सेविका, पालक प्रतिनिधी विद्यार्थी यांच्या हस्ते आपल्या शाळेचे पालक चेतन राजगुरू यांनी शाळेला भेट दिलेल्या फुलझाडांचे रोपण शाळेच्या पटांगणावर करण्यात आले.

इयत्ता १ली ते ७ वी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठल रुक्मिणीच्या, संतांच्या व वारकऱ्यांच्या रूपांमध्ये आले होते. विठ्ठलाला साकडे घालून नवभारत साक्षर करण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.” सारे शिकूया, साक्षर होऊया, निरक्षरांना साक्षर करूया!” “जल ही जीवन है!” “झाडे लावा झाडे वाचवा”. “निसर्गाचे संरक्षण करूया पर्यावरण वाचूया!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांकडून विठ्ठल नामाचा घोष करून घेण्यात आला. विठ्ठलाची गाणी गाण्यात विद्यार्थी दंग झाले होते. ह्या उत्साहात शाळेच्या मुख्याध्यापिका भावना राठोड, सर्व पालक प्रतिनिधी, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आषाढी एकादशीचे अप्रतिम फलक लेखन शाळेचे सहकारी शिक्षक इथापे यांनी केले. छायाचित्रण व व्हिडिओ संकलन माळी व राऊत यांनी केले. शाळा समितीचे अध्यक्ष, सदस्य व संस्था पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img