कल्याण
कल्याण परिसरामध्ये (Kalyan) सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कल्याण पूर्वतील कचरे (Kachore) टेकडीवरील दरड कोसळल्याची (collapses) घटना घडली आहे. ही घटना घडताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या टेकडीवर जवळपास 140 कुटुंब राहत आहे. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी यापूर्वीच प्रशासनाकडून या भागातील नागरिकांना स्थालांतरणाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
आज सोमवारी दुपारच्या सुमारास कचोरे टेकडीवरील दरड कोसळली. त्यासोबत मातीचा काही भागही स्खलीत झाला. हा प्रकार घडताच नागरीकांनी भयभीत होत त्याठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची पाहणी केली. नागरीकांना घरे स्थलांतरीत करण्याचे आवाहन केले. हिले यांनी सांगितले की, टेकडीपरिसरातील 140 नागरीकांना यापूर्वीच घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. काही नागरीक घरे साेडून जातात. पाऊस थांबला की पुन्हा त्याठिकाणी येतात.