पुणे
राज्याच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड झाली आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांना या भेटीबद्दल विचारण्यात आले. यावेळी भुजबळ साहेबांना भेटायला गेलेत? असा सवाल पत्रकारांना करत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट रविवारी बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा झाला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला होता. त्यानंतर भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याने ते अजित पवार गटात नाराज आहेत का अशीही चर्चा सुरु झाली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पुण्यात आहे. पवार साहेब आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाणार नसल्याची मला माहिती आहे. ते आज सिल्व्हर ओकवर राहाणार होते. भुजबळ त्यांच्या भेटीसाठी गेल्याची मला माहिती नाही. त्यांनी भेट घेतली का याची माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महायुतीमध्ये भुजबळ यांची हेळसांड होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या पक्षांत कोण येणार हा कोणा एकाचा व्यक्तिगत निर्णय नसेल. आमची संघटना मिळून याबाबत निर्णय घेतला आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तसेच यावेळी त्यांनी पुण्याच्या ट्रॅफिकवर भाष्य केले आहे. कात्रजच्या चौकात अनेक अतिक्रमण आहेत. कुणाचाही अतिक्रमण असेल सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर ते अतिक्रमण काढायला पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. सर्वसामान्य पुणेकर ट्रॅफीकमध्ये भरडला जातोय असे पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या.