मुंबई
मुंबईच्या (Mumbai) मरिन ड्राइव्ह (Marine Drive) येथील समुद्रात एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. ममता कदम असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती अंधेरी येथील रहिवाशी होती. दरम्यान, पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याचं समोर आली आहे. मरिन ड्राइव्ह (Marine Drive Police) पोलीस आणि अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणीला समुद्रातून बाहेर काढले.
मरीन ड्राईव्ह य़ेथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने समुद्रातून तरूणीला बाहेर काढून मुंबईतील जी.टी.रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यावेळी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला होता.