23.1 C
New York

Dombivli : सतीश गायकवाड यंदाच्या ‘गिरीमित्र’ पुरस्कार प्रदान

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

एकविसाव्या गिरीमित्र संमेलनात डोंबिवलीकर (Dombivli) ज्येष्ठ गियारोहक, माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवलीचे संस्थापक सतीश गायकवाड (Satish Gaikwad) उर्फ डॅडी यांना संस्थांत्मक कार्यासाठी ‘गिरीमित्र’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. मुलुंड येथे महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात 13 व 14 जुलै रोजी सहाशे डोंगर भटक्या गिरीप्रेमिंच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न संपन्न झाला.

ज्यांनी अष्टहजारी चौदा शिखरे सर केली असे अल्पाईन पद्धतीच्या आरोहाणातील अग्रणी,ऐकलं आणि वेगळ्या मार्गाने आरोहणात हार्दिक हातखंडा, प्रतिकुल वातावरणात हिवाळी मोहिमात एव्हरेस्ट, कांचन जुंगा व ल्होसे सर करणारे पहिले गिर्यारोहक असे प्रमुख पाहुणे पोलंडचे ज्येष्ठ गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलेक्की व संमेलनाचे विशेष अतिथी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सतीश गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.फिल्म, छायाचित्र, रील, रेखाचित्रे, अनुभव कथन, ब्लॉग, अभ्यासपूर्ण सादरीकरण तसेच व्यासपीठावर डायनो व बोल्डरिंग या स्पर्धाचे सादरीकरण करून विजेत्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दुर्ग संवर्धन आणि बचाव मोहिमेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना त्यांच्या कार्याचा आढावा सादर करून प्रोत्साहन पर सन्मानित करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनासाठी गिरीमित्र च्या अनुभवी कार्यकर्त्यांच्या बरोबरीने सर्व विभागात काम करण्याची संधी यंदा डोंबिवलीच्या “मॅड ” अर्थात माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवलीच्या पदाधिकारी व सदस्यांना मिळाली. ती प्रत्येकाने जबाबदारीने योग्यरित्या पार पडण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img