19.7 C
New York

Sanju Rathod: वाह वाह! अंबानींच्या वरातीत मराठमोळा गायक संजू राठोड थिरकला

Published:

Sanju Rathod: मराठमोळा गायक संजू राठोड (Sanju Rathod) याच ‘गुलाबी साडी’ हे गाणं अफलातून गाजलं. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत हे गाणं सर्वानाच आवडलं. ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर रिल्स प्रचंड व्हायरल झाल्या इतकंच नव्हे तर गायक संजू राठोडने या गाण्याच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्धी मिळवली. केवळ मराठी इंडस्ट्री, बॉलीवूड इंडस्ट्री नव्हे तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनाही ‘गुलाबी साडी’ची चांगलीच भुरळ पडली होती. आता संजू राठोडसाठी एक अत्यंत खास गोष्ट अशी की, नुकतंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ‘गुलाबी साडी’ हे गाणं गाऊन संजू राठोडने वरातीत सर्वांना ठुमके लगावण्यास भाग पाडलं.

‘गुलाबी साडी’ गाण्यावर वऱ्हाड थिरकलं
Sanju Rathod: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा पार पडण्याआधी वरात आयोजित केली होती. या वरातीचे अनेक विडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाला जगभरातले सेलिब्रिटी आणि मान्यवर पाहुणे उपस्थित होते. अशातच भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायकांनी आपलं गाणं या लग्नसोहळ्यात सादर केलं होत. या सर्व गायकांच्या मांदियाळीत मराठमोळा गायक संजू राठोडचीही खास एंट्री झाली होती. ‘गुलाबी साडी’ हे गाणं संजूने गायल्यावर अंबानींचं वऱ्हाड मंचावर येऊन नाचताना दिसलं. ‘गुलाबी साडी’ गाण्यावर सर्वांनीच भन्नाट डान्स केला.

भूमिकन्येची लगीनघाई रंगणार विशेष भागात…

संजू राठोडची मोठी मजल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची गेल्या तीन-चार महिन्यांपासून धामधूम सुरु आहे. अनंत-राधिका अखेर १२ जुलैला लग्नबंधनात अडकले. या लग्नामध्ये संजू राठोडला मिळणारं आमंत्रण त्याच्यासाठी ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. अंबानींच्या भल्या मोठ्या सोहळ्यात आपल्या गाण्यावर लाईव्ह लोक थिरकताना पाहणं, यासारखी संजूसाठी दुसरी कोणीतीच आनंदाची गोष्ट नसू शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img