23.1 C
New York

Sanjay Raut : संजय राऊतांच्या मोदी- शहांवर हल्लाबोल, म्हणाले

Published:

मुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. त्यांच्या या निर्णयाला इंडिया आघाडीकडून (India Alliance) तीव्र विरोध करण्यात आला आहे. तर याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. पैशांच्या बळावर ज्या पद्धतीने क्रॉस व्होटिंग करून घेतले ती सुद्धा संविधानाची हत्या नाही का? असा खोचक सवाल राऊतांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

संजय राऊत म्हणाले की, तारीख पे तारीख 14 जुलैला होणारी सुनावणी 14 ऑगस्टवर गेली. यातून पक्षांतर करणाऱ्या अन् क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळते. खरं म्हणजे देशातील घटनाबाह्य सरकार रोखण्याचे काम न्यायव्यवस्था अन् संविधानाचे आहे. पण आपले न्यायलय ही नरेंद्र मोदी अन् अमित शहांच्या दबावाखाली काम करतात का? अशी लोकांना शंका येऊ लागली आहे.

संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेतसुद्धा 200 कोटींचा निधी दिला. 8 लाख कोटींचे सरकारवर कर्ज आहे. 200 कोटींचा निधी उधळला गेला. 10 कोटी ते 25 कोटीपर्यंत रोख रक्कमा देण्यात आल्या. काही आमदारांना जमिनी दिल्या हे संविधानाला धरून आहे का? तुम्ही परिपत्रक काढले की 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळणार. पण आता जे चालले आहे ते संविधानाला धरून आहे का? समाजवादी पार्टी, एमआयएम हे वेगळ्या विचारसरणीचे पक्ष मानतात, त्यांनी कोणाला मतदान केले हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ज्याप्रकारे क्रॉस वोटिंग झालं. त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये यांच्यावर आम्ही तारखांवर तारखा घेतोय, कारवाई करत नाही. त्यामुळेच यांची भिती चेपली आहे. आम्ही एका पक्षाच्या तिकीटावर निवडून यायचं आणि कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्याला मतदान करायचं. अशी टीका राऊतांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, नोटबंदी हा देखील हत्या दिवसच आहे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नोटबंदी केली. पण देशातील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी ट्रक-ट्रक भरून नोटा आमदार फोडण्यासाठी आणि क्रॉस व्होटिंगसाठी देण्यात आल्या. आज त्यांचेच लोक, आमदार खासदार फोडण्यासाठी टॅम्पो भरून भरून हा काळा पैसा वाटत आहेत. आता नरेंद्र मोदींनीच सांगावे. तसेच, अर्बन नक्सल कायदा हा देखील विरोधकांना त्रास देण्यासाठी करण्यात आला आहे. ते स्वत: औषध घेत नाही. पण त्याच औषधात विष कालवून दुसऱ्याला देतात, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img