3.8 C
New York

Vishalgad : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतीवर गुन्हा दाखल

Published:

मुंबई

विशाळगड (Vishalgad) परिसरात तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांच्यासह 50 ते 60 जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५०० हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले आहे. तर शाहूवाडी पोलिसांकडून संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. 

संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर अतिक्रमण मुक्ती मोहीम रविवारी राबविण्यात आली. मात्र काही वेळानंतर या मोहिमेला हिंसक वळण लागण्याचं पाहायला मिळालं. संभाजी राजे छत्रपती यांच्यावर आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. काल विशाळगड परिसरात दगडफेक आणि तोडफोड झालेल्या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंलं होतं. शाहूवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे , शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या दहा पेक्षा अधिक कलम अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img