3.8 C
New York

Vishalgad : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल

Published:

मुंबई

विशाळगड (Vishalgad) परिसरात तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांच्यासह 500 हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले आहे. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर शाहूवाडी पोलिसांकडून संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. 

संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर अतिक्रमण मुक्ती मोहीम रविवारी राबविण्यात आली. मात्र काही वेळानंतर या मोहिमेला हिंसक वळण लागण्याचं पाहायला मिळालं. संभाजी राजे छत्रपती यांच्यावर आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. काल विशाळगड परिसरात दगडफेक आणि तोडफोड झालेल्या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंलं होतं. शाहूवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे , शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या दहा पेक्षा अधिक कलम अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की,  काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असं आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img