आज राज्यातील मराठवाडा व विदर्भ या भागात मोठा पाऊस (Rain Updates) होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. (Rain) त्याचबरोबर अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपुर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकणात मुंबई शहर व उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Marathwada) काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडाव असं आवहान शासनाने केलं आहे. कोकणाला पुढील काही तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे
अशातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण (Konkan Rain Updates) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) आजचा दिवसही पावसाचाच राहणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri Rain) आणि रायगड (Raigad Rain) जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत. कोकणात मुसळधार पाऊस झाला. अनेक नद्यांना पूर आला आहे, काही ठिकाणी रस्ते ठप्प देखील झाले आहेत. त्याचप्रमाणे, आज मुंबईतही (Mumbai Rain Updates) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे. रविवारी सकाळपर्यंत मुंबईत 862 मिमी पावसाची नोंद झाली आहे असून मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरी 855.7 मिमी पाऊस पडला आहे. तर जून पासून आत्तापर्यंत मुंबईत 1209 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत मध्यम तर, काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्याला पुढील 24 तासात अति मुसळधार पावसाचा इशारा
Rain Updates मुंबईत पाणीसाठ्यात वाढ, पाणीकपात मात्र कायम
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 68 हजार दशलक्ष लिटरची भर पडली आहे. धरणांतील पाणीसाठा 29.73 टक्क्यांवर आला असून 24 तासांत 18 दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली असून धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Rain Updates रायगडमध्ये नद्यांच्या पातळीत वाढ
रायगड जिल्ह्यात शनिवारी रात्रभरापासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.