21 C
New York

Leopard : ओतूर येथील हांडेबन शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर येथील हांडेबन शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची (Leopard) मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

श्री काकडे अधिक माहिती देताना म्हणाले की,ओतूरच्या हांडेबन शिवरात बिबट्याचा वावर असल्याने, येथील शेतकरी  बाबाजी पानसरे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात सोमवार दि.१५ रोजी पहाटेच्या सुमारास  बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली,सदर माहिती मिळताच ओतूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले, वनसेवक किसन केदार,गणपत केदार,फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव, विजय वायाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली,जेरबंद बिबट्याच्या मादीचे वय ४ वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. जेरबंद बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवरा केंद्रात सोडण्यात आले. सदर कामी येथील शेतकरी भानुविलास गाढवे,भास्कर डुंबरे,सुनील डुंबरे,संतोष पानसरे, विघ्नेश पानसरे व प्रसाद तांबे यांनी मदत केली
 

बिबट प्रवण क्षेत्रात काम करताना सर्वांनी सुरक्षितता बाळगावी.शेतात काम करताना भगीनींनी गळ्याभोवती स्कार्फ बांधावा,अंधारात एकटे जाऊ नये बरोबर काठी व बॉटरी असावी, आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, आपल्या जनावराचा गोठा बंदिस्त ठेवावा, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, मुलांनी शाळेत जाताना समुहाने जावे,शेतात घराभोवती दिवे लावावेत असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img