23.1 C
New York

Bigg Boss Marathi 5:’बिग बॉस’च्या घरात कोकणातील ‘या’ सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची एट्री

Published:

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi Season 5) पर्व पाचवे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील लोकांचा आवडता कार्यक्रम आहे. यंदाच्या पाचव्या पर्वामध्ये एक मोठा बदल असा दिसणार आहे की, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या जागी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा कार्यक्रमचं सूत्रसंचालन करणार आहे. येणाऱ्या २८ जुलैला ‘बिग बॉस मराठी’चा नवा पर्व सुरु होणार आहे. प्रेक्षकांच्या मनात आता एकच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस मराठीच्या मेकर्सकडून किंवा कलर्स मराठी वाहिनीवर अद्याप स्पर्धकांची घोषणा करण्यात आली नाहीये. पण, सध्या एक प्रसिद्ध असणार नाव सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे.

Bigg Boss Marathi 5: एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनबाबत माहिती देणाऱ्या एका फॅनपेजवरुन ही माहिती शेअर करण्यात आली आहे. आता लोकप्रिय व्यक्ती आहे तरी कोण? तर ती म्हणजे ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी मुलगी अंकिता वालावलकर. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अंकिता सहभागी होणार असल्याचं म्हंटलं जातंय. मात्र, याबाबत अद्याप तिनं, बिग बॉस मराठी अधिकृत किंवा कलर्स मराठी वाहिनीने सांगितलेलं नाही.

Bigg Boss Marathi 5: कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असते. अंकिताचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांनी तिच्या प्रत्येक व्हिडिओचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं आहे. अंकिता वालावलकरने कोकणातल्या बोलीभाषेचा, तिथलं घर, बागा, आणि निसर्गसौंदर्याचा वापर करून तिने अनेक व्हिडीओ बनवत आपला मोठा चाहतावर्ग कमावला आहे. मात्र, अनेकदा तिला ट्रोलही केलं गेलंय. याचबरोबर अभिनेता ओंकार भोजनेसोबत असलेल्या नात्यामुळे अंकिता चर्चेत आली होती. गेल्यावेळी ओंकारसोबतचा फोटो व्हायरल झालेला त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी आहे, अशा चर्चाना उधाण आलं होत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img