3 C
New York

Maharashtra Government : वयोवृद्धांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा

Published:

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजने’नंतर आता महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) जाहीर केली आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना या योजनेंतर्गत देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे फक्त राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल. आता या योजनेचे शासकीय परिपत्रकही काढण्यात आले असून यामध्ये कोणकोणत्या तीर्थस्थळांचा समावेश आहे?

Maharashtra Government ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यामागे सरकारचा मानस काय?

भारत विविधतेनं नटेलेला देश आहे. आपल्या देशात विविध धर्मांचे आणि पंथांचे लोक राहतात. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात.

परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्यानं आणि पुरेशी माहिती नसल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Government कोणाला लाभ मिळणार? योजनेचं उद्दीष्ठ काय?

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Government ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यासाठी काय पात्रता आवश्यक?

लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक
वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img