3.7 C
New York

Chhagan Bhujbal : पवारांच्या निवास्थानी भुजबळ वेटिंगवर

Published:

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे आपल्या ताफा घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न भुजबळ यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये भुजबळांचा ताफा कैद झाल्याने याबाबतची माहिती समोर आली. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी, या मागणीसाठी छगन भुजबळ यांनी ही भेट घेतली की यामागे काही वेगळी राजकीय गणिते आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Chhagan Bhujbal छगन भुजबळ वेटिंगवर

शरद पवार यांच्याकडून आज केवळ दोन व्यक्तींना भेटीसाठी वेळ देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. यापैकी एक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर त्यांना सिल्वर ओक मधून बाहेर पडल्याची माहिती आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीच भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले. मात्र शरद पवार यांची वेळ न घेताच छगन भुजबळ त्यांना भेटायला पोहचले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज केवळ मिलिंद नार्वेकर यांना पवारांच्या भेटीसाठी वेळ देण्यात आली होती. मात्र सकाळी भुजबळ अचानक सिल्व्हर ओक मध्ये आल्याने राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. पण अद्यापही शरद पवार यांनी भुजबळ यांची भेट घेतली नसून तासाभरापासून भुजबळ हे वेटिंगवरच आहेत. छगन भुजबळ हे वेळ न घेता पवार यांच्या भेटीला आले आहेत. तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे वेळ घेऊन पवार यांच्या भेटीला आले होते.

त्यामुळे पवार यांनी नार्वेकर यांना आधी भेट दिली. त्यामुळे भुजबळ यांना तिष्ठत राहावं लागल्याचं सांगितलं जात आहे. भुजबळ यांना पहिल्यांदाच पवारांची भेट घेण्यासाठी ताटकळत राहावं लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज भुजबळांनी थेट पवारांचे निवाससथान गाठल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ अचानक पवारांच्या भेटीसाठी का आले याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र त्यामुळे अनेकांची उत्सुकता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img