राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर आज ते थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटीला गेले आहेत. तर पवार आणि भुजबळांच्या या भेटीमुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये केलेल्या बंडाच्या वेळीच्या शरद पवार आणि भुजबळ यांच्या एका फोन कॉल ची सध्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली काय होता हा किस्सा नेमका? जाणून घेऊ…
गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्येच राष्ट्रवादी पक्षामध्ये बंद करून अजित पवार हे राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर या बंडावर प्रचंड टीका-टिप्पणी झाली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी या आमदारांसोबत जाताना शरद पवार यांना एक फोन कॉल केला होता. स्वतः शरद पवारांनी सांगितलेला जो किस्सा प्रचंड गाजला होता.
पवार म्हणाले होते की, पक्षामध्ये बंड करून भुजबळ हे अजित पवारांच्या सोबत सत्तेत सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी मला एक फोन केला होता. त्यात ते म्हटले होते की, ‘अजित पवार गटामध्ये नेमकं काय सुरू आहे? हे बघतो आणि येतो’. मात्र भुजबळ जे अजित पवार गटात गेले. ते परतलेच नाही. असा किस्सा त्यावेळी शरद पवार यांनी सांगितला होता. त्यानंतर आता पुन्हा शरद पवारांनी छगन भुजबळ यांची भेट होत असताना त्या किस्स्याची चर्चा सुरू झाली आहे.
आता बस्स! मला साधी विधानपरिषद मिळाली तर -पंकजा मुंडे
Chhagan Bhujbal भुजबळ-पवारांच्या भेटीवर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया…
या भेटीच्या चर्चेदरम्यान आता अजित पवार गटाकडून या भेटीवर पहिली प्रक्रिया समोर आली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी यावर बोलताना म्हटलं की, शरद पवार हे राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. तसेच छगन भुजबळ हे देखील जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाताना कुणाला विचारून जाण्याची आवश्यकता नाही. राज्यात नेहमीच वेगवेगळ्या पक्षांचे नेते अशा प्रकारच्या भेटीगाठी घेत असतात.
तसेच आम्ही जरी भाजपसोबत गेलो असलो तरी शरद पवारांना बाबत आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही. ते आमचे दैवत आहे. त्यामुळे पवार आणि भुजबळ यांच्या भेटीचा वेगळा अर्थ घेण्याचं कारण नाही. आम्ही सरकारमध्ये आणि ते विरोधातच आहेत. त्याचबरोबर आपली भूमिका पटवून देण्यासाठी टीका टिप्पणी ही होतच असते. जशी टीका भुजबळांनी आरक्षणाप्रकरणी शरद पवार यांच्यावर केली. अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून आली आहे.