3.5 C
New York

Vishalgad : विशाळगडावर दगडफेक अतिक्रमणाचा मुद्दा पेटला

Published:

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमणाच्या मुद्द्याला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण (Vishalgad Encroachment) हटावसाठी आज संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. दगडफेकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. त्याचबरोरीने विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजी राजे यांनी संपर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना चलो विशाळगडचा नारा दिला आहे. त्यामुळे विशाळगडाच्या दिशेने हजारो शिवभक्त येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आज संभाजी राजे छत्रपती यांनी चलो विशाळगड अशी हात दिली असल्याने कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच आता गडावरुन ही बातमी समोर येत असल्याने कोल्हापूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. विशाळगडाच्या वाटेवर असलेल्या संभाजी राजे छत्रपतींनी ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं तो आज संकटात आहे. माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे असं वक्तव्य संभाजी राजे छत्रपती यांनी केल आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img