मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण देण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारने अद्यापही आरक्षणाची घोषणा केली नाही. त्यामुळं जरांगेंचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांच लक्ष लागलं. अशातच आता जरागेंनी मोठी घोषणा केली. मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांनी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, मराठा आरक्षणासह विविध नऊ मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम देऊनही मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, आता ते कसे मिळवायचे आम्ही पाहतो. मी पुन्हा येत्या 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी राज्यातील 288 मतदारसंघांत उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे ठरवू, असा इशाराही जरांगेंनी दिला.
आता मी उपोषण करावे, अशी समाजाची इच्छा नाही. पण, मी त्यांचे मन बदलेन. समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे. समाज मोठा झाला पाहिजे. समाज सुखी झाला पाहिजे, असंही जरांगे म्हणाले. 40 वर्षे लढणाऱ्यांना सरकारने काहीही दिले नाही, पण 10 महिन्यांत काही ना काही मिळालंय ना? दीड कोटी मराठे ओबीसी प्रवर्गात आले आहेत. छगन भुजबळ तू पायावर चालतो मी डोक्यावर चालतो, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवरही जरांगेंनी हल्लाबोल केला.
Manoj Jarange Patil फडणवीस दबाव आणत असतील…
पुढं बोलताना जरांगेंनी फडणवीसांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. दिलेल्या मुदतीत आरक्षन न मिळाल्यास त्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. आमचा सरकारवरील विश्वास उडाला आहे, असं आम्ही कधीच म्हटले नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा आरोप जरांगे यांनी केला.