8.3 C
New York

Bachchu Kadu : ..तर विधानसभा लढणार नाही आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा

Published:

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू (Maharashtra Election) लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पिछेहाटीनंतर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला गुडन्यूज मिळालं. यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मतदारसंघांची चाचपणी केली जात असतानाच महायुतीतील घटक असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu) मोठी घोषणा केली आहे. येत्या 19 तारखेला आम्ही सरकार आणि महायुतीला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन माझी जागा महायुतीला देणार अशी घोषणा, कडू यांनी केली.

आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे मांडणार आहेत. जर युतीने या मागण्या मान्य केल्या तर बच्चू कडू आमदारकी लढणार नाही. माझी सीट मी महायुतीला देऊन टाकीन. शेतीतील पेरणी आणि पीक कापणीपर्यंतची जी काही कामे असतात ती एआरईजीएसमधून झाली पाहिजेत. पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे. दिव्यांग नागरिकांना प्रति महिना सहा हजार रुपये महिना द्यावा. शिक्षण आणि आरोग्यात जी विषमता वाढत चालली आहे त्यात समानता आणावी अशा प्रकारच्या 18 मागण्या आहेत त्या सरकारपुढे ठेऊ.

क्रॉस व्होटिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आमदार, वरिष्ठांना सगळं माहित

मी महायुतीत नाही. तुम्हाला तसं कुणी सांगितलं आहे का असा सवाल उपस्थित करत आमची तिसरी आघाडी नाही. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची पहिली आघाडी तयार करू. आमच्यानंतर त्यांची आघाडी आहे, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले. बच्चू कडूंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. आता बच्चू कडू यांनी 19 तारखेला मागण्यांचं निवेदन सरकार आणि महायुतीला दिल्यानंतर त्यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bachchu Kadu विधानपरिषदेत महायुतीचं जोरदार कमबॅक

राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेतील अकरा जागांच्या निवडणुकीचा निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीने विजयाचा गुलाल उधळत सर्व 9 उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीचेही दोन उमेदवार विजयी झाले. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना फक्त बारा मते मिळाली. जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. या फुटीमुळेच जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष आता काढला जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img