21 C
New York

Satara : सातारा जिल्ह्याला पुढील 24 तासात अति मुसळधार पावसाचा इशारा

Published:

सातारा

हवामान विभागाच्या (IMD) अलर्टनुसार सातारा (Satara) जिल्ह्यात रविवारी दिवसभर मुसळधार (Rain Alert) पाऊस झाला. पावसामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली असून पाण्याची आवक ३८ हजार क्युसेकवरून 64 हजार क्युसेकवर गेली आहे.

सातारा – हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार रविवारी दिवसभर सातारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चोवीस तासात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मंत्रालयातील नियंत्रण कक्षाने नागरीकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

कोयनानगर आणि नवजात ३०७ मिलीमीटर पाऊस

कोयनानगर आणि नवजा याठिकाणी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या दरम्यान तब्बल ३०७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. कोयनानगरमध्ये १२२ मिलीमीटर तर नवजा येथे १८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत महाबळेश्वरला केवळ ५२ मिलीमीटर पाऊस झालाय. नवजा याठिकाणी १ जूनपासून आज अखेर एकूण सर्वाधिक २२१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ३३ टीएमसी

पश्चिम भागातील पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या ९ तासात पाणीसाठ्यात २ टीमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ३३.२८ टीएमसी झाला आहे. तसेच २४ तासात धरणात ३८ हजार क्युसेक इतकी आवक सुरू होती. ती अवघ्या सहा तासात ६४ हजार क्युसेकवर पोहचली आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img