7.6 C
New York

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून ऑडी कार ताब्यात

Published:

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या (IAS Pooja Khedkar) अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनीही (Pune Police) कारवाईस सुरुवात केली आहे. पूजा खेडकर पुण्यात असताना (Pune Police) त्यांच्या राजेशाही थाटाची मोठी चर्चा झाली होती. त्या वापरत असलेल्या ऑडी कारचीही वेगळीच चर्चा होती. आता हीच ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चतुःश्रृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस ठाण्याला बॅरेकेटिंग करुन ही कार ताब्यात घेण्यात आली आहे. याच ऑडी कारला अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावण्यात आला होता.

ऑडी कारच्या कागदपत्रांसह तपासणीसाठी हजर राहावे अशी नोटीस पुणे पोलिसांनी बजावली होती. हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर आता पुणे पोलिसांनी कारवाई करत ही कार ताब्यात घेतली आहे. पूजा खेडकर यांनी या कारचा दंड भरला आहे की नाही याबाबत मात्र खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. नियमानुसार खासगी वाहनाला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावता येत नाही. पूजा खेडकरी यांची ऑडी कार त्यांची खासगी कार होती. तरी देखील त्यांनी या कारवर महाराष्ट्र शासन असा फलक लावला होता. तसेच याच कारवर लाल आणि निळा दिवाही लावला होता. याच ऑडी कारमधून त्या पुण्यातील जिल्हाधिकरी कार्यालयात येत होत्या. त्यावेळी त्यांच्या या आलिशान ऑडी कारची मोठी चर्चा होत असायची. आता हीच कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाच्या मेळाव्यात सांगलीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या थाटाला पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खासगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे अशा थाटात खेडकर यांचा पुण्यात वावर होता. शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणीच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केली होती. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली.

IAS Pooja Khedkar पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप?

वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img