वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरनंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्याही अडचणी वाढत चालल्या आहेत. पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) आईचा हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर पौड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी नवीन कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) मनोरमा खेडकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या बाणेर येथील घराबाहेर पोलिसांनी ही नोटीस लावली आहे. तुमचे पिस्तुलाचे लायसन्स रद्द का करू नये? असा सवाल पोलिसांनी या नोटिशीद्वारे विचारला आहे.
मनोरमा खेडकर यांच्या शस्त्र परवान्यासंदर्भात ही नोटीस आहे. तुमच्याकडील पिस्तुलाचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये असा सवाल पोलिसांनी या नोटीसद्वारे विचारला आहे. मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध आधीच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील पिस्तुलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नोटीस देण्यासाठी पोलीस खेडकर यांच्या बाणेर येथील घरी पोहोचले होते. परंतु, त्यांनी ही नोटीस खेडकर यांच्या घराबाहेर चिकटवली आहे. आता या नोटिसीला मनोरमा खेडकर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
..तर विधानसभा लढणार नाही आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा
Manorama Khedkar पूजा खेडकरची ऑडी कार ताब्यात
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या (IAS Pooja Khedkar) अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनीही (Pune Police) कारवाईस सुरुवात केली आहे. पूजा खेडकर पुण्यात असताना (Pune Police) त्यांच्या राजेशाही थाटाची मोठी चर्चा झाली होती. त्या वापरत असलेल्या ऑडी कारचीही वेगळीच चर्चा होती. आता हीच ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चतुःश्रृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस ठाण्याला बॅरेकेटिंग करुन ही कार ताब्यात घेण्यात आली आहे. याच ऑडी कारला अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावण्यात आला होता.