21 C
New York

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्यावरुन शरद पवारांवर भुजबळांचा गंभीर आरोप

Published:

बारामती

बारामतीमध्ये अजित पवार यांचा जनसन्मान मेळावा पार पडला, यादरम्यान छगन भुजबळ यांनी भाषण केलं. भाषणादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आरक्षणाचं (Maratha Reservation) भांडण मिटाव म्हणून सह्याद्रीला सरकारने बैठक बोलावली, त्या बैठकीला सर्व येणार होते परंतु बारामतीतून फोन आल्यानंतर विरोधकांनी आरक्षणाविषयीच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मागून सल्ले देतात अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. दरम्यान महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरु असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

मागील आठवड्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, विरोधकांनी या बैठकीला बहिष्कार टाकल्याने सत्ताधारी चांगलेच संतापले. बारामतीतून फोन गेल्यानंतर मविआच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. हाच आरोप आता मंत्री छगन भुजबळ यांच्याकडूनही करण्यात आला आहे. तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, मग राज्यातल्या ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे? असा प्रश्न भुजबळांनी शरद पवारांना विचारला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, काही लोकांचा असा प्रयत्न आहे की आरक्षणाच्या मुद्यावरुन आपापसात भांडणं, मारामा-या व्हाव्यात. मात्र, आमची भूमिका अशी आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गानेच आम्ही जाणार आहोत, फक्त ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, एवढी काळजी फक्त घ्यावी.

छगन भुजबळ म्हणाले की, तसेच, तुमचा राग हा अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण मग ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे? बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मंते दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाही. विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा असा उद्योग सुरू आहे, असा आरोपच भुजबळांकडून शरद पवार यांचे नाव न घेता केला आहे. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसले आहात? अशी विचारणाही भुजबळांकडून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img