19.1 C
New York

Sangli : ठाकरे गटाच्या मेळाव्यात सांगलीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Published:

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या (उबाठा गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा शनिवारी कराडमध्ये झाला. या मेळाव्यात सांगली जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या मागणीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात सांगलीच्या जिल्हाध्यक्ष बदलाच्या मागणीवरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विभागीय संपर्क नेते आ. भास्कर जाधव यांच्या समोरच धक्काबुक्की तसेच थोबाडीत मारण्याची घटना घडली.

Sangli सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटात धुसफूस?

जिल्हास्तरीय मेळाव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर सांगलीच्या जिल्हाप्रमुख बदलाच्या मागणीवरून जिल्हाध्यक्ष संजय विभुते आणि तासगावमधील कार्यकर्ते सचिन चव्हाण यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी सचिन चव्हाण यांना धक्काबुक्की करत श्रीमुखात लगावल्याचे समजते. या राड्यामुळे विभागीय संपर्क नेते, आमदार भास्करराव जाधव चांगलेच संतापले होते. जिल्हाध्यक्षांचे हे वागणे बरोबर नाही, असे खडे बोल आमदार भास्कर जाधवांनी सुनावल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा

Sangli धक्काबुक्कीच्या प्रकरणावर सारवासारव

मेळाव्यातील धक्काबुक्कीच्या प्रकरणावर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सारवासारव केली जात आहे. सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांच्यावर आरोप करणारा कार्यकर्ता हा अनेक पक्ष बदलून शिवसेनेत (उबाठा गट) आला असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. तसेच मेळाव्यानंतर सर्वजण विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या सोबत एकत्र आले होते. मात्र, सांगली जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sangli विधान परिषद निवडणुकीत विश्वजीत कदमांचं मत फुटलं?

आमदार विश्वजीत कदमांनी लोकसभा निवडणुकीच्या विरोधात काम केल्याचं स्पष्टच झालंय. त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बोलण्यात उथळपणा दिसत होता. ते शिवसैनिकांना रुचलेलं नाही. विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांमध्ये विश्वजीत कदमांचा मीडियामध्ये फोटो येतोय का? असा उपरोधिक सवाल करत ते फुटले असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img