3.7 C
New York

IND vs SL : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात बदल

Published:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि श्रीलंका दौऱ्याच्या (IND vs SL) वेळापत्रकात थोडा बदल केला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पहिला टी 20 सामना 26 जुलै रोजी होणार होता. आता हा पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया (Team India) तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. झिम्बाब्वे दौरा (IND vs ZIM) आणि विश्वचषकातील यशानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास (T20 World Cup) प्रचंड वाढला आहे. तर दुसरीकडे श्रीलंका संघाला (India vs Sri Lanka) खराब कामगिरीतून बाहेर पडून चांगला खेळ दाखवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून (Rohit Sharma) निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद (Hardik Pandya) दिले जाईल अशी शक्यता आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी कोणता संघ असेल याचाही निर्णय अजून घेतला गेलेला नाही. मात्र हेड कोच म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचा श्रीलंका दौरा 7 ऑगस्टला संपणार आहे. या दौऱ्याच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. मात्र कोणताही सामना रद्द केलेला नाही. स्टेडियमही बदललेले नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

IND vs SL असे आहे सुधारित वेळापत्रक

सुधारित वेळापत्रकानुसार पहिला टी 20 सामना 27 जुलै रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल. दुसरा सामना 28 जुलै रोजी तर तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होईल. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी दुसरा सामना तर 7 ऑगस्ट रोजी तिसरा सामना कोलंबोत होणार आहे.

IND vs SL टी 20 सामन्यांचे वेळापत्रक

पहिला टी 20 सामना 27 जुलै
दुसरा टी 20 सामना 28 जुलै
तिसरा टी 20 सामना 30 जुलै

IND vs SL एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

पहिला सामना 2 ऑगस्ट
दुसरा सामना 4 ऑगस्ट
तिसरा सामना 7 ऑगस्ट

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img