बीड
विधान परिषदेतील (Legislative Council) विजयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याचे घोषित झाल्यानंतर बीडमधील (Beed) त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (Pankaja Munde) आता माजलगावमधील काही उत्साही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं अभिनंदनाचं पोस्टर (Pankaja Munde Banner) लावलंय. विधान परिषदे त्यावर पंकजा मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. माजलगाव परिसरातील ब्रह्मगावचे उपसरपंच अनिल कांबळे यांनी हे बॅनर लावले आहेत. दरम्यान या बॅनरवरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा भावी उपमुख्यमंत्री मा. पंकजाताई मुंडे यांचं हार्दिक अभिनंदन असं लिहीत माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. माजलगावच्या पंकजा मुंडे समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरजी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांना 26 मतांनी विजय झाला आहे. त्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.