19.1 C
New York

INDIA Alliance : विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा

Published:

देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील (By Election 2024) पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडीने भाजपला (INDIA Alliance) जोरदार धक्का दिला आहे. निवडणुकीचा निकाल आजच येणार (Elections 2024) आहे. बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, रानाघाट दक्षिण आणि माणिकताला, तामिळनाडूतील विक्रवांडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर तसेच पंजाबमधील जालंधर या मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) पहिलीच पोटनिवडणूक होती.

हिमाचल प्रदेशातील तीन (Himachal Pradesh) जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दोन जागांवर काँग्रेस (Congress Party) आणि एका जागेवर भाजप उमेदवाराने (BJP) विजय मिळवला आहे. उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला होता. पश्चिम बंगालमधील (West Bengal) दोन जागांचे निकाल हाती आले असून या दोन्ही जागा सत्ताधारी टीएमसीने (TMC) जिंकल्या आहेत. बिहारमधील रुपौली (Rupauli) मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जेडीयू (JDU) उमेदवार कलाधर मडंल यांचा पराभव केला. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अमरवाडा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश शाह (Kamlesh Shah) यांनी विजय मिळवला.

या पोटनिवडणुका इंडिया आणि एनडीए दोघांसाठीही महत्वाच्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत तर इंडिया आघाडी विजयी घोडदौड करताना दिसत आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील देहरा मतदारसंघात मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांच्या पत्नीने विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार होशियार सिंह यांचा 9 हजार 399 मतांच्या फरकाने पराभव केल. काँग्रेसने पहिल्यांदाच या मतदारसंघात विजय मिळवला आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत’ 5 मोठे बदल

INDIA Alliance बद्रीनाथमध्येही भाजपचं पानिपत

उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघातही भाजपाचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार लखपत सिंह बुटोला विजयी झाले आहेत. या मतदारसंघातील पराभव भाजपसाठी धक्कादायक असाच आहे. मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघात अटीतटीची लढाई झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमलेश शहा विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या धीरेन शाह यांनी कडवी टक्कर दिली मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही.

INDIA Alliance बिहार-बंगालमध्येही एनडीएला धक्का

बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी बाजी मारली. सुरुवातीच्या फेऱ्यात जेडीयू उमेदवार कलाधर मंडल आघाडीवर होते. राजदच्या बीमा भारती दुसऱ्या क्रमांकावर होत्या. नंतर मात्र शंकर सिंह यांनी आघाडी घेत बाजी मारली. पश्चिम बंगालमधील राणाघाट मतदारसंघात टीएमसी उमेदवार मुकूट मणि अधिकारी यांनी 39 हजार 48 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. बागदा मतदारसंघात टीएमसी उमेदवार मधुपर्णा ठाकूर यांनी 33 हजार 455 मताधिक्याने विजय मिळवला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img