विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या (MLC Election 2024) निवडणुकीचा निकाल काल लागला. या निवडणुकीत महायुतीने सर्व नऊ उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना यश मिळालं. पण, काँग्रेसची सात (Congress Party) ते आठ मतं फुटल्याने शरद पवार गटाच्या (Sharad Pawar) पाठिंब्यावर उभ्या असलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा (Jayant Patil) पराभव झाला. हा पराभव आघाडीच्या नेत्यांना टोचू लागला आहे. महायुतीकडून केली जात असलेली टीका आणि या पराभवामागचं काय कारण आहे, याची उत्तरं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहेत. मुळात जयंत पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी भरपूर प्रयत्न केले असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. तसेच महायुतीवर घणाघाती टीका केली. विधानपरिषदेत जयंत पाटलांच्या पराभवाचं कारण काय असा प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले, मागील विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांना काँग्रेसच्या 7 लोकांनी पाडलं होतं. त्यांच्यामुळेच काल शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काल आमदारांचा भाव शेअर मार्केट सारखा चढत होता. काहींना तर 2 एकर जमिनी दिल्या. काही आमदार स्वतःला धरमनिरपेक्ष समजतात मात्र काल त्यांनी धर्मांध पक्षांना साथ दिली. काल याच आमदारांचे भाव 20 कोटींपासून सुरू झाले होते, असा आरोप त्यांनी केला.
आजी-माजी आमदारांच्या एकीने पुणे काँग्रेसमध्ये भूंकपाचे संकेत
काँग्रेसची सात मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण ही मतं आधीच फुटलेली होती. मागच्या विधानपरिषद निवडणुकीत याच लोकांनी चंद्रकांत हंडोरेंचा पराभव केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मात्र एकही मत फुटलेलं नाही असा दावा संजय राऊत यांनी केला. काँग्रेसची फुटलेली मतं दोन वर्षांपासून त्यांच्या बरोबर नाहीत. या निवडणुकीत जयंत पाटील यांचाही विजय झाला असता पण गणित जुळलं नाही. त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचंही मत नव्हतं. अन्य पक्षांवर गणित अवलंबून होतं. परंतु, फुटीर आमदार सत्ताधाऱ्यांसोबत होते.
Sanjay Raut जयंत पाटील पराभूत झाले तरी कसे?
या निवडणुकीत ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली. दुसऱ्या क्रमांकाच्या फेरीत मात्र नार्वेकरांनी बाजी मारली. त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मतं फुटल्याने त्यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेस,शेकाप आणि माकप यांच्या मदतीने वियजी होऊ असा विश्वास त्यांना वाटत होता.
प्रत्यक्षात मात्र ही रणनीती फेल ठरली. काँग्रेसने मदत केलीच नाही असा थेट आरोप जयंत पाटील यांनी निकालानंतर केला. मला माझी हक्काची बारा मते मिळाली असे सांगत त्यांनी तडक अलीबागची वाट धरली. जयंत पाटील यांनी काँग्रेसची मते मिळालीच नाहीत शिवाय शरद पवार गट, माकपा किंवा शेतकरी कामगार पक्षाची मतं फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.