2.4 C
New York

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. ते सुमारे 29,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. (PM Modi) संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील (Mumbai ) गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये पंतप्रधान पोहोचतील, जिथे ते रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करतील. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान वांद्रे कुर्ला संकुलातील आयएनएस टॉवर्सचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नवी मुंबईतील तुर्भे येथे मध्य रेल्वेच्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलची पायाभरणी करणार आहेत. यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्ताराच्या कामाच उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते मुंबईतील वाहतूक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करतील. रेल्वे, रस्ते आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर नवीन INS टॉवर्सचे उद्घाटन करण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारतीय वृत्तसेवा (INS) सचिवालयाला भेट देतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यात ते अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा सुमारे 1 तासाचा वेळ वाचणार आहे.

अन्यथा महागात पडेल; जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

PM Modi प्रशिक्षण योजनाही करणार लाँच

मोदींच्या हस्ते 6,300 कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचेही लोकार्पण होणार आहे. तो गोरेगावमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला मुलुंडमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडेल. प्रवासाचा वेळ सध्याच्या 75 मिनिटांवरून या प्रकल्पामुळे 25 मिनिटांवर येणार आहे. तसेच नवी मुंबईत कल्याण यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्प आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल देखील सुरू करणार आहे. आज पंतप्रधान हे 5,600 कोटी रुपयांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू करतील. तरुणांची बेरोजगारी दूर करणे आणि 18 ते 30 वयोगटातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img