वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा आणि वडील दिलीप यांच्यासह सात जणांवर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आयपीसीच्या कलम 323, 504, 506 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसंच, शस्त्रास्त्र कायद्याच्या आरोपांचाही समावेश करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी सांगितले की,
दिपाली यांचे वडील दिलीप हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी आहेत. खेडकर कुटुंबीयांनी बाऊन्सरच्या मदतीने शेजारील शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना धमकावलं, असा दावा स्थानिकांनी केला आहे. मनोरमा बळजबरीने त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शेतकरी कुलदीप पासलकर यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी शेतकरी पंढरीनाथ कोंडिबा पासलकर यांना बंदुक दाखवून धमकावले होते. या प्रकरणी आता शेतकरी पासलकर यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यावरुन खेडकर कुटुंबातील काही सदस्यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 विद्यार्थी ‘ISIS’च्या जाळ्यात
पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. अधिकारीपणा मिजास मिरवण्याच्या नादात अधिकारीपदच राहाते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातून वाशिमला उचलबांगडी झाली. केंद्रीय संस्थांकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागला. आता पूजा खेडकर सोबत तिचे कुटुंबिय देखील अडकत चालले आहेत. पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकर यांच्यावर मुळशीतील एका शेतकऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाचे एकना अनेक कारनामे समोर येत आहेत, त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशी आवस्था खेडकर कुटुंबाची होत आहे.