21 C
New York

Manoj Jarange : अन्यथा महागात पडेल; जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

Published:

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली मुदत आज (दि.13) संपणार आहे. त्याआधी पुन्हा एकदा जरांगेंनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देत मराठ्यांचा रोष परवणार नाही असे म्हणत अजूनही वेळ गेलेली नसल्याचे म्हटले आहे. ते छ.संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले की, सरकार ज्या पद्धतीने आरक्षणाबाबत हालचाली करत आहे. ते बघता मराठ्यांचा रोष सरकारल परवडणारा नाही. आरक्षणासाठी सगळे मराठे हळू हळू कामधंदे सोडून लेकरांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शिंदे समितीने नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं असे जरांगेंनी म्हटले आहे.

महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

Manoj Jarange मला अन् माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही

राज्य सरकारला मी सावध करतो असे म्हणत त्यांच्या हातातून अद्यापही वेळ गेलेली नसून मला किंवा समाजाला राजकारणात यायचं नाहीये. तुम्ही आम्हाला त्यात ढकलण्याचं काम करू नका. तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका. नाईलाजाने राजकारात आलो तर, शंभर टक्के 288 उमेदवार पडणार असा दावाही जरांगेंनी केला.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. माता माऊलींसह सर्वजण रस्त्यावर येत असून, जातीय वाद निर्माण होऊ देऊ नका. आम्ही जातीय वादी नाही. ओबीसी समाजाने आणि मराठा समाजाने एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊ देऊ नये असे सांगत राजकारणी लोक राजकारण करू पाहत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img