20.9 C
New York

Angkrish Raghuvanshi : केकेआर बॅटर अंगक्रिश रघुवंशीने मागितली माफी, केलं होतं हे ट्विट

Published:

निर्भयसिंह राणे

या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या केकेआर संघाचा भाग होता अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi)

कोलकाता नाईट राइडर्सचा (KKR) युवा क्रिकेटपटू अंगक्रिश रघुवंशीने (Angkrish Raghuvanshi) सायना नेहवालवर (Saina Nehwal) टिप्पणी दिल्याबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली आहे. अंगक्रिशने X वरील त्याच्या अधिकृत खात्यावर माहिती दिली की तो एक विनोद होता, परंतु ते फार अपरिपक्व होते हे मान्य करतो. निखिल सिम्हा सोबत झालेल्या नुकत्याच पॉडकास्टमध्ये बोलताना सायना नेहवालने इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटला भारतात भरपूर लक्ष मिळतं अशी तक्रार व्यक्त केली. तिच असा म्हणणं आहे की क्रिकेटला इतर खेळांपेक्षा कमी तग धरण्याची गरज लागते.

“कधीकधी, मला वाईट वाटते की क्रिकेटकडे सवांचे लक्ष वेधून घेतले जाते. क्रिकेटची गोष्ट बघितली तर… जर तुम्ही पहिले तर बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस आणि इतर खेळ शारीरिकदृष्ट्या खूप कठीण आहेत”, अस सायना निखिल सिम्हाच्या पॉडकास्टवर म्हणाली.

Gautam Gambhir : गौतम गंभीरला टीम इंडियासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मोर्ने मॉर्केल हवा

अंगक्रिशने X वर सायना नेहवालची खिल्ली उडवली की ती जसप्रीत बुमराहच्या रॉकेटसारख्या बाउन्सरच्या समोर कशी जाते हे पाहण्याची माझी इच्छा आहे. केलेली टिप्पणी हटविल्यानंतर, त्याने X वर खाली लिहिले :

“मला सगळ्यांनी माफ करा, मी माझ्या टिप्पण्यांचा अर्थ विनोद म्हणून केला होता, मग परत पाहताना मला वाटले की अपरिपक्व विनोद होता. मला माझी चूक समजली आणि मी सर्वांची मनापासून माफी मागतो.

दरम्यान, १९ वर्षीय अंगक्रिश रघुवंशीने या वर्षीच्या स्पर्धेत पदार्पण केले आणि १० सामन्यात १५५.२४ च्या स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img