Makeup Mistakes: पार्टीला जाणं, बॉयफ्रेंडसोबत डेटला जाणं किंवा कोणत्या फंक्शनला तयार होऊन जाणं महिलांना मात्र मेकअप करणं कधीच टाळता येऊ शकत नाही. मेकअप करणं ही स्त्रियांची आवडती गोष्ट आहे. प्रत्येक तरुणीला एकच वाटत असतं की आपण सर्वात सुंदर दिसायला पाहिजे. त्यासाठी मुली किंवा महिला वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात. चेहऱ्याला फाउंडेशन, लिपस्टिक, हायलायटर, पावडर यासह विविध प्रोडक्ट्स अप्लाय करतात. मात्र मेकअप करताना त्यांच्या हातून काही छोट्या-छोट्या चुका घडतात आणि मग चेहरा खराब होऊ लागतो. मेकअप सुरुवातीपासून करणं ते आपला बेस पूर्ण होईपर्यंत करणं जितकं सोप्प आहे तितकंच आपल्या त्वचेची काळजी घेणंही फार महत्वाचं आहे. चला तर मग त्याबद्धल आज आपण जाणून घेऊया..
१) चेहरा आणि हात स्वच्छ धुवून घ्या
Makeup Mistakes: मेकअप करण्याआधी सर्वात पहिल चेहरा आणि दोन्हीही हात स्वच्छ थंड किंवा कोमट पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुवून घेतल्याने चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारची धूळ राहणार नाही. चेहऱ्यावर ओपन फोर्स ओपन असतात त्याने चेहऱ्यावर अॅक्ने तयार होत नाहीत. तसंच स्वच्छ चेहऱ्यावर मेकअपचा बेस अगदी सहजपणे अप्लाय करता येतो.
२) प्रॉडक्ट्सच्या एक्सपायरी डेटची काळजी घ्या
बऱ्याचवेळा आपलं मेकअप प्रॉडक्ट्सच्या एक्सपायरी डेटकडे लक्ष द्यायचं राहून जात. त्यामुळे मेकअप अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला खाज सुटणे, लालसरपणा येणे किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यासाठी कोणतेही प्रॉडक्च चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी एक्सपायरी डेट तपासून घायला हवी. विशेष म्हणजे डोळ्यांचा मेकअप करण्यावेळी जास्त काळजी घ्या, बहुतेकजण डोळ्यांसाठी वापरली जाणार प्रॉडक्ट्सचा लाईफस्पॅन कमी असतो.
३) मेकअप ॲप्लिकेटर्स स्वच्छ करताना हातांचा वापर टाळा
जितक्यावेळा आपण मेकअप ॲप्लिकेटर्सचा वापर करतो तर वेळोवेळी त्याचीसुद्धा तितकीच काळजी घेणं महत्वाचं आहे. अनेकदा काहीजण स्वतःच्या हाताने ॲप्लिकेटर साफ करतात. मात्र यामुळे हातातील जंतू ॲप्लिकेटरमध्येही येण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे कधीही ॲप्लिकेटर नेहमी टिश्यू किंवा कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. मेकअप ॲप्लिकेटर जास्त स्वच्छ करण्याची गरज असेल तर कोमट पाण्याचा वापर करा.
४) सनस्क्रीनचा वापर टाळू नका
तुम्हाला दिवसा मेकअप करायचा असेल तर सनस्क्रीन अजिबात लावायला विसरू नका. कारण सनस्क्रीन मेकअपचा बेस स्थिर ठेवण्यास आणि उत्पादनांच्या रसायनांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतो. सनस्क्रीनचा जाड थर लावल्याने, उत्पादन त्वचेच्या पेशींच्या थेट संपर्कात येणार नाही. यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्यही चांगलं राहील आणि तुम्हाला त्वचेच्या समस्यांचा धोकासुद्धा राहणार नाही.
अक्षरशः किळसवाणं! चटणीत तरंगताना दिसला चक्क जिवंत उंदीर
5) मेकअप काढल्याशिवाय झोपू नका
बऱ्याच महिला मेकअप करून घरातून सकाळी कामाला बाहेर पडतात. मग त्या गडबडीत मेकअप धुवण काहींच्या लक्षात राहत नाही पण हे फार धोकादायक ठरू शकत. रात्री मेकअप करून झोपणं म्हणजे त्वचेच्या समस्यांना बोलावण्यासारखंच आहे. रात्रीच्या वेळी त्वचेला बरं होण्याची संधी मिळते. अशा वेळी मेकअप त्वचा बरं होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला थांबवू शकतो. यासोबतच उत्पादनातील बुरशीजन्य संसर्ग आणि रसायनेही बॅक्टेरियाचे कारण बनतात. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरच्या मदतीने मेकअप काढून त्वचेला मॉयश्चरायझर लावून झोपावे.