निर्भयसिंह राणे
कार्लोस अल्काराझने (Carlos Alcaraz) विम्बल्डन (Wimbledon) 2023 च्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव करून ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकवले होते.
डिफेंडिंग चॅम्पियन कार्लोस अल्काराझने शुक्रवारी सेंट्रल कोर्टवर झालेल्या उपांत्य फेरीत रशियन स्टार टेनिसपटू दनिल मेदवेदेवचा (Daniil Medvedev) 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करून विम्बल्डनच्या 2024 च्या अंतिम सामन्यात आपले स्थान प्राप्त केले.
मेदवेदेवने अल्काराझवर वर्चस्व राखल्यानंतर कार्लोसला पहिला सेट जिंकता आला नाही. तरीही, विद्यमान चॅम्पियनने गेममध्ये पुनरागमन केले आणि विम्बल्डन 2024 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित कारण्यासाठी सलग तीन सेट जिंकले. विम्बल्डन 2024 च्या अंतिम सामन्यात, कार्लोस अल्काराझचा सामना नोव्हाक जोकोविच विरुद्व खेळाला जाईल.
Angkrish Raghuvanshi : केकेआर बॅटर अंगक्रिश रघुवंशीने मागितली माफी, केलं होतं हे ट्विट
डिफेंडिंग चॅम्पियन कार्लोस अल्काराझने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत युनायटेड स्टेट्सच्या टॉमी पॉलचा (Tommy Paul) 5-7, 6-4, 6-2 आणि 6-2 असा पराभव करून कार्लोस विम्बल्डन 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचला. पॉलविरुद्धच्या सामन्यात कार्लोसने संघर्ष केला आणि पहिला सेट 5-7 ने गमावला. पण पुढच्या सेटमध्ये त्याने मुसंडी घेत तो सेट 6-4 असा जिंकला.
तिथून कार्लोसने मे वळून पहिले नाही आणि गेमचा तिसरा आणि अंतिम सेट 6-2, 6-2 असा जिंकून मेदवेदेव विरुद्ध सामना निश्चित केला ज्याने सध्याच्या जागतिक नंबर 1 इटलीच्या जानिक सिन्नरचा (Jannik Sinner) पराभव केला.