19.7 C
New York

Anant Ambani And Radhika Merchant Wedding: शुभमंगल सावधान! अनंत अंबानी व राधिका मर्चंट झाले साता जन्माचे साथी

Published:

Anant Ambani And Radhika Merchant Wedding: शुभमंगल सावधान… अखेर अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा थाटात शाही विवाहसोहळा (१२ जुलै) शुक्रवारी रात्री बीकेसीमधल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. हा लग्नसोहळ्याला बॉलीवूड कलाकार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांसह अनेक परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली होती. संध्याकाळी बरोबर ५ वाजता या शुभमुहुर्ताला सुरुवात झाली. सोहळासमारंभ सुरु होताच बॉलीवूड सेलिब्रिटींनी नटून थटून अगदी लग्नाच्या थीमनुसार लग्नमंडपात एन्ट्री घेऊन पापाराझींसमोर पोज दिल्या. अशातच या सोहळ्यामधल्या अनेक आतल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघे लग्नबंधनात अडकण्यापूर्वी ग्रँड लग्नवरातीचा कार्यक्रम पार पडला. लग्नाच्या वरातीत प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अनिल कपूर, अनन्या पांडे, वीर पहारिया, वरुण धवन, सलमान खान, मानुषी, खुशी कपूर, रितेश-जिनिलीया, माधुरी दीक्षित,शाहरुख खान या सर्व सेलिब्रिटींनी जबराट डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंटने वरात चालू असताना सासरेबुवा मुकेश अंबानी यांचा हात धरून लग्नमंडपात एंट्री घेतली. राधिका मर्चंटला मुकेश व नीता अंबानी स्वतःच्या मुलीप्रमाणेच सांभाळतात. त्यामुळे सुनेच्या स्वागतासाठी लग्नमंडपात दोघांनीही पुढाकार घेतला होता. वरात संपल्यानंतर लग्नसोहळ्याच्या स्वागताला सुरुवात झाली.

लग्नाच्या मंडपात राधिकाच्या थाटामाटात झालेल्या एन्ट्रीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होत. अंबानींच्या धाकट्या सुनेने रथात बसून या सोहळ्यात एंट्री घेतली. यावेळी सगळेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. वरमाला, सात फेरे अशा सगळ्या विधी पार पडल्यांनंतर अनंत व राधिका साता जन्माचे साथी होऊन लग्नबंधनात अडकले.

तंटा नाय तर घंटा नाय! ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा २०२३ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर यंदाच्या मार्च २०२४ मध्ये गुजरातमधील जामनगर येथे या दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला तर दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीत क्रुझवर पार पडला होता. मुकेश अंबानींच्या राहत्या बंगल्यावर म्हणजेच अँटालियावर अनंत – राधिकाच्या लग्नाआधीचे सर्व विधीवत कार्यक्रम पार पडले होते. तर आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. १४ जुलै रविवार सायंकाळी अंबानी कुटुंबीयांनी अनंत-राधिकाच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img