पुणे : विधानपरिषदेच्या काल (दि.12) पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची (Congress)साधारण 7 ते 8 मते फुटल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी पुण्यातील काँग्रेसचे आजा माजी आमदारांनी एकी करण्यास सुरूवात केली असून, या सर्वांनी खांदेपालटाची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय भूंकप होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.
Congress मुंबईत काय झाली खलबंत
शहरातील काही आजी माजी नेत्यांनी नुकतीच मुंबईत पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नितला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, रमेश अय्यर, जया किराड, नरुद्दीन सोमजी, विजय खळदकर आदी उपस्थित होते. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जागांवर विजय मिळवायचा आसेल, तर शहराध्यक्ष बदला, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. तसेच याबाबत योग्य तो न्याय न मिळाल्यास दिल्लीतील हायकमांडकडे जाणार असल्याचाही इशारा या नेत्यांनी दिला आहे.
पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, आई-वडिलांवर गुन्हा दाखल
Congress लोकसभेनंतर काँग्रेससाठी चांगले वातावरण
लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षासाठी देश व राज्यातही चांगले वातावरण आहे. त्यात गेल्या विधानसेच्या निवडणुकीत पुणे कँटोन्मेन्ट आणि शिवाजीनगर या जागांवर चांगली लढत दिली होती. त्यामुळे जर, या मतदारसंघांमध्ये येत्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल, तर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना बदलण्यात यावे अशी मोठी मागणी आजी माजी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे जर, विधानसभेच्या तोंडावर शहराध्यक्ष बदलण्याबाबत काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.