16.1 C
New York

Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये दीड महिन्यात ५५ इंच पावसाची नोंद, वेण्णा तलाव ओव्हरफ्लो!

Published:

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचं सौंदर्य सध्या पाऊस (Mahabaleshwar) आणि धुक्यानं खुललं आहे. १ जून ते १२ जुलै दरम्यान महाबळेश्वरमध्ये ५५ इंच पावसाची नोंद झालीय. पावसामुळं महाबळेश्वर आणि पाचगणीची तहान भागवणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे.

सातारा – महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन हंगामाला सुरूवात झाली आहे. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्वरमध्ये दीड महिन्यात ५५ इंच पावसाची नोंद झालीय. त्यामुळे वेण्णा तलाव तुडुंब भरून वाहत आहे. वेण्णा तलाव हा महाबळेश्वर आणि पाचगणीची जीवनवाहिनी मानला जातो.

Mahabaleshwar पावसाने ५० इंचाचा टप्पा ओलांडला

महाबळेश्वरला पावसाचे आगार समजलं जातं. याठिकाणी दीड महिन्यात एकूण ५५.४ इंच इतका पाऊस झाला आहे. पावसाने ५० इंचाचा टप्पा गाठताच वेण्णा तलाव तुडुंब होतो. १२ जुलै पर्यंत ५५ इंच पाऊस झाल्यानं वेण्णा तलाव तुडुंब भरून वाहू लागलाय. तसंच तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वेण्णा तलाव परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे.

अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Mahabaleshwar महाबळेश्वर हरवलं धुक्यात

महाबळेश्वरमध्ये सध्या पाऊस आणि धुकं पाहायला मिळतंय. या धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. दाट धुक्यात पर्यटक सेल्फी घेताना दिसतात. तसेच हौशी पर्यटक घोडेस्वारीचाही आनंद लुटत आहेत. खरेदीसाठी पर्यटकांची महाबळेश्वरच्या बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे.

Mahabaleshwar महाबळेश्वरात १५०० मिलीमीटर पावसाची नोंद

महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. १ जून ते १३ जुलै पर्यंत महाबळेश्वरमध्ये १५१५ मिलीमीटर (५५.००४ इंच) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ११९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत नवजामध्ये सर्वाधिक १८६३ पावसाची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img