राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलाबाबतची अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. नव्या बदलानुसार यापुढे महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही.याशिवाय आणखीनही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana Rule Change)
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana अधिसूचनेत काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयात लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.
‘कॅग’कडून राज्य सरकारवर ताशेरे; अजितदादांचं काम वाढलं!
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana आणखी कोणते नियम बदलले
नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे त्यामुळे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे..
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिले अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर यात सुधारणा करण्यात आली असून, 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तर, लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana वयाच्या अटीतही बदल
सुरूवातीला या योजनेसाठी 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, ही अट वाढवून आता 21 ते 65 अशी करण्यात आली आहे. शिवाय 5 एकर जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे.