विधानपरिषदेच्या (Vidhanparisgad Election) 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपला नेमका पाठिंबा कोणाला असणार याबाबत थेट भाष्य केलं. दोन वर्षांपासून आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे कडू यांनी स्पष्ट केलं.
मतदानापूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आम्ही दोन वर्षांपासून शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही त्यांच्यासोबत आहे. त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला. मी स्वत: आणि आमदार राजकुमार पटेल आम्ही दोघे शिंदे साहेबांसोबत आहोत. भावना गवळी आणि कृपाल तुमाने या शिंदे साहेबांच्या दोन्ही उमेदवारांना आम्ही मतदान करू. कारण ते दोघेही विदर्भातील आहेत. मतदारसंघात आम्हाला भरपूर निधी मिळाला. आम्ही आमचे कर्तव्य बजावणारा आहोत. या सरकारकडून मिळालेल्या निधीची जाणून घेऊन आम्ही मतदान करणार आहोत, असं कडू म्हणाले. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळं मत फुटण्याची शक्यता आहे, त्यावर बोलतांना कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांच मला सांगता येत नाही.
राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करू…; दानवेंचं मोठं विधान
Bachchu Kadu कोणतीही अदृश्य शक्ती काम करणार नाही
ते म्हणाले, मी गोरगरीबांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या मनात काय चालतं? एवढं डोकं चालवत नाही. आज संध्याकाळपर्यंत समजेल कोण पडेल? कोण जिंकेल? कोणतीही अदृश्य शक्ती काम करणार नाही, शिंदे यांचे दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.