21 C
New York

Wanindu Hasaranga : वनिंदूं हसरांगाने श्रीलंकेच्या कर्णधार पदाचा दिला राजीनामा

Published:

निर्भयसिंह राणे

फिरकी गोलंदाज वनिंदूं हसरांगाने (Wanindu Hasaranga) 10 सामन्यांमध्ये श्रीलंकेचे (Sri Lanka) नेतृत्व केले, परंतु T20 विश्वचषक 2024 मधील ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यामुळे त्याने ही भूमिका घेतली.

वनिंदूं हसरंगाने कर्णधारपद सोडल्यामुळे श्रीलंका क्रिकेटला (SLC) मोठा धक्का बसला आहे. वनिंदूने 10 सामन्यांमध्ये श्रीलंका संघाचे नेतृत्व केले, परंतु यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे नुकताच झालेल्या T20 विश्वचषक 2024मधून श्रीलंकेची ग्रुप स्टेजमधून एग्झिट झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असावा.

26 जुलैपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्ध श्रीलंकेच्या व्हाईट बॉल सामन्यापूर्वी ही बातमी आली आहे. दोन्ही संघात तीन एकदिवसीय आणि तितक्याच T20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. 2014 T20 विश्वचषक जिंकलेल्या श्रीलंकेला या वर्षीच्या विश्वचषकात एकाच विजय प्राप्त झाला तो सुद्धा नेदरलँड्सविरुद्ध होता, त्यानंतरचा नेपाळविरुद्ध समना पावसामुळे वाहून गेल्याने त्यांना उपांत्यफेरीत मजल मारता नाही आली.

Champions Trophy 2025 : ‘ तो भारताचे आदरातिथ्य विसरेल’, शाहिद आफ्रिदीने केलं हे वक्तव्य

हसरंगाने त्याच्या राजीनामा पात्रात असा म्हंटले आहे की:

“एक खेळाडू म्हणून श्रीलंकेसाठी नेहमीच माझे सर्वोत्तम प्रयत्न असतील आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या संघाला आणि नेतृत्वाला पाठिंबा देईन आणि उभा राहीन”.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर ख्रिस सिव्हरवूडने सुद्धा श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असून सनथ जयसूर्याची अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती कारणात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img