3.6 C
New York

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्वांनाच मताच्या वजाबाकीची चिंता

Published:

आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत आहे. (Vidhan Parishad election) या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतफुटीचा धोका असून, पराभूत कोण होणार याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान मतफुटीची सर्वच पक्षांनी धास्ती घेतली असून बहुतेक पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. यावेळी पसंतीक्रमानुसार मतदान कसं करायचं याची रणनीती काल दिवसभर आखण्यात आली आहे.

Vidhan Parishad election व्हिप जारी

आज सकाळी ९ वाजल्यापासून विधानभवन परिसरात मातदानाला सुरूवात होणार आहे. ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. तर, लगेच पाच वाजता मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेतील ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त झाले. त्यानंतर झालेल्या रिक्त जागेंसाठी हि निवडणुक होत आहे. विधानसभा निवडणुकीला केवळ तीन महिने असताना महायुती तसंच महाविकास आघाडीत यानिमित्ताने संघर्ष पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आमदारांसाठी गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये स्नेहभोजन ठेवलं होतं. काँग्रेसने आमदारांना पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणं बंधनकारक असल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Vidhan Parishad election आमदार हॉटेलमध्ये

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मध्य मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. यावेळी स्नेहभोजनाला पक्षाचे ११ आमदार उपस्थित होते. उर्वरित चार सदस्य नंतर या आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये येतील असे एका नेत्याने स्पष्ट केलं होतं. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार विमानतळानजिक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तर शिंदे गटाचे आमदार वांद्रे येथील हॉटेलमध्ये ठेणवण्यात आले. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर त्यांचे आमदारही पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले होते.

विधानसभेपूर्वी मविआ, महायुतीची उद्या अग्नीपरीक्षा, कोणाचे ‘बारा’ वाजणार?

Vidhan Parishad election काँग्रेसकडे अतिरिक्त मतं

काँग्रेस पक्षाकडे त्यांचा उमेदवार विजयी झाल्यानंतर अतिरिक्त मतं आहेत. अन्य कोणाकडेच त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांना स्वबळावर निवडून आणण्याइतके बळ नाही. त्यामुळे मतफुटीचा धोका आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिंदे गट तसंच अजित पवार गटातील काही आमदारांची मतं फुटतील असा अंदाज मविआच्या गोटातून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

विधानसभेतील २८८ जागांपैकी १४ जागा रिक्त असल्याने सध्या २७४ सदस्य आहेत. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी प्रथम पसंतीची २३ मते आवश्यक आहेत. भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदे गट, अजित पवार गट यांचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस एक, ठाकरे गट एक आणि शरद पवार गटाने उमेदवार उभा न करता शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Vidhan Parishad election विधानसभेतील सध्याचे बलाबल

भाजप १०३
शिवसेना शिंदे गट ३८
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४२
काँग्रेस ३७
शिवसेना उद्धव ठाकरे गट १५
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १०
बहुजन विकास आघाडी ३
समाजवादी पक्ष २
एमआयएम २
प्रहार जनशक्ती २
स्वाभीमानी पक्ष १
जनसुराज्य शक्ती १
मनसे १
माकप १
राष्ट्रीय समाज पक्ष १
क्रांतिकारी शेतकरी पक्ष १
शेतकरी कामगार पक्ष १
अपक्ष १३

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img