21 C
New York

Pankaja Munde  : अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार! विधान परिषद निवडणुकीत विजयी

Published:

मुंबई

आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या विधान परिषदेत पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत काय होणार? अशी चर्चा होती. खासकरून सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू होती. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी निर्धारीत करण्यात आलेल्या कोट्यापेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळवला आहे. विजयासाठी 23 मते आवश्यक होती. पण पंकजा मुंडे यांनी 26 मते मिळवली आहेत. त्यांनी तीन अतिरिक्त मते घेतली आहेत. त्यामुळे अखेर पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला आहे.

  • महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे 22 मतांवर अडकले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्यावर उभे असलेले शेकापचे जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु आहे.
  • महायुतीचे उमेदवार
  • भाजपा
  • पंकजा मुंडे – २६ (विजयी)
  • परिणय फुके – २६ (विजयी)
  • योगेश टिळेकर – २६ (विजयी)
  • अमित गोरखे – २६ (विजयी)
  • सदाभाऊ खोत – २६ (विजयी)
  • शिवसेना एकनाथ शिंदे गट
  • भावना गवळी – २४ (विजयी)
  • कृपाल तुमाने – २५ (विजयी)
  • राष्ट्रवादी अजित पवार गट
  • राजेश विटेकर – २३ (विजयी)
  • शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
  • महाविकास आघाडीचे उमेदवार
  • काँग्रेस
  • प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
  • शिवसेना उद्धव ठाकरे गट
  • मिलिंद नार्वेकर – २२
  • राष्ट्रवादी शरद पवार गट
  • जयंत पाटील(शेकाप) – ८

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img