21 C
New York

Nawab Malik : नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा ‘हा’ दिलासा

Published:

मुंबई

विधान परिषदेचे निवडणुकीकरिता (Legislative Council Elections) मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या जामिनाला दोन आठवड्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित व्यक्तीकडून कुर्ला येथील जमीन खरेदी केल्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग (Money Laundring Case) झाल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.

सविस्तर माहिती अशी की, कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. आज नवाब मलिक यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडून जामीनावर मुदतवाढ मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

नवाब मलिक यांच्या या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामीनाला आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. 2022 मध्ये कथित गोवावाला कंपाऊंड प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2023 मध्ये ते आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img