संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान होत आहे. ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा पराभव याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे आमदार फुटू नये यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने विशेष काळजी घेतली आहे. मात्र तरीही देखील काँग्रेसचे ८ ते १० आमदार फुटणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. संख्याबळानुसार या निवडणुकीत महाविकास आणि महायुतीचा कोणताच उमेदवार स्वबळावर निवडणून येऊ शकत नाही. त्यामुळे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
विधान परिषद निवडणुकीत आत्तापर्यंत झालेलं मतदान किती ? आकडेवारी आली समोर
या छोट्या पक्षांमध्ये एमआयएम, समाजवादी पक्ष आणि प्रहारचा समावेश आहे. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी शिंदे गटाला मतदान करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संख्याबळानुसार या निवडणुकीत महाविकास आणि महायुतीचा कोणताच उमेदवार स्वबळावर निवडणून येऊ शकत नाही. त्यामुळे छोट्या पक्षांना मोठा महत्व प्राप्त झाला आहे. माहितीनुसार महायुतीसाठी अपक्ष आमदार, मनसे, जन सुराज्य शक्ती, भारतीय शेतकरी, कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष मतदान करणार आहे. मात्र तरीही देखील महायुतीला आणखी चार आमदारांची गरज आहे.
विधानसभेत समाजवादी आणि एमआयएमचे २ – २ आमदार आहे. समाजवादी पक्ष महाविकास आघाडीचा भाग आहे मात्र अद्याप त्यांनी त्यांचे पत्ते उघड केलेले नाही. त्याचप्रमाणे एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. जर महाविकास आघाडीला समाजवादी आणि एमआयएमचा पाठिंबा मिळाला नाहीतर महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक खूपच अवघड जाणार आहे. त्यामुळे समाजवादी पार्टी आणि एमआयएम या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.