23.1 C
New York

MLC Election : ज्याला तुम्ही बारावा खेळाडू समजता तो खेळणारा, राऊतांचे सूचक विधान

Published:

मुंबई

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election) आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत (MLC Election) नेमका कोणाच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्वाचे विधान केले आहे. विधानपरिषदेच्या मतदानासाठी आमदारांसोबत विधानभवनात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेल आहे. आज लागणार निकाल हा उद्याच्या चार महिन्यात लागणाऱ्या निकाल ठरवणार आहे. आजच्या निकालानंतर कोण कुठे पळून जाते हे तुम्हाला कळेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीमधील राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले की, मला अजित पवार, शेकापचे जयंत पाटील भेटले, चंद्रकांत पाटील भेटले. महाराष्ट्राच्या राजकारणात घाण देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. तोच अधिकार गणपत गायकवाड यांना दिला. याबाबत निवडणूक आयोगात जे गेले आहेत ते योग्य आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो मोदींना भेटतो ते आमचे हात धरतात आम्ही अनेक वर्ष काम केलेला आहे एकत्र त्यांचा आमचा वैयक्तिक भांडण आहे का? आम्हाला बघून प्रत्येकाला मागेच फिरावे लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. मागच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी येथून पळ काढला होता. आमचे तिन्ही उमेदवार हे व्यवस्थित निवडून येतील. या निवडणुकीमध्ये ज्याला तुम्ही बारावा खेळाडू समजत आहे तेच खेळाडू खेळणार आहे असे वक्तव्य करत मिलिंद नार्वेकर विजय होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. कोण पडेल हे मी सांगू शकत नाही असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img