21 C
New York

Samvidhaan Hatya Diwas : ‘या’ दिनी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’; केंद्र सरकारकडून घोषणा

Published:

मुंबई

लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी संविधानाच्या (Constitution of India) मुद्यावरून सत्ताधारी भाजपला चांगलेच घेरले होते. त्यानंतर भाजपने आणीबाणीचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर पलटवार केला. पण एवढ्यावर न थांबता आता मोदी सरकारने आणीबाणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आणीबाणी लावण्यात आल्याचा दिवस संविधान हत्या दिन (Samvidhaan Hatya Diwas) म्हणून सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ही घोषणा केली आहे. याबाबतचे अधिसूचना जारी करण्यात आले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्राने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली होती. यातच मोदी सरकारने काँग्रेसला कोंडीत पकडत हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img