26.6 C
New York

Bigg Boss Marathi Season 5: तंटा नाय तर घंटा नाय! ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर

Published:

Bigg Boss Marathi Season 5: छोट्या पडद्यावर चांगलाच गाजणारा आणि वादग्रस्त असणारा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सीझनची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट आणि लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) ‘बिग बॉस मराठी’च्या पाचवा सीझनचं सुत्रसंचालन करणार असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासूनच मराठी सर्व रसिक प्रेक्षकांना व बिग बॉस चाहत्यांना हा सिझन कधी सुरु होणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर… तारीख ठरलीच. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड प्रिमियरची तारीख अखेर जाहीर झाली आहे.

Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या ४ सीझनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वानंतर जवळपास २ वर्षांनी ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाचव्या सीझनचा एक नवा, जबराट प्रोमो प्रदर्शित झाला असून यामधून ‘बिग बॉस’च्या घराचं दार आता कधी उघडलं जाणार हे समोर आलं आहे.

Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखचा नवीन प्रोमोमध्ये एक वेगळाच रांगडा अंदाज पाहायला मिळतो आहे. या प्रोमोमध्ये रितेशची एक वेगळीच ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा सगळे स्पर्धक ढोल ताशाच्या गजरात ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जो चांगला वागणार त्यांची रितेश वाहवाह करणार…पण जो वाईट वागणार त्यांची तो…एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन चांगलाच गाजणार…कारण रितेश म्हणतोय, “मी येणार कल्ला तर होणारच”. आपल्या आवडत्या ‘बिग बॉस’ प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीख देखील जाहीर केली. हा प्रोमो सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ड्रामा, मजा, मस्ती अन् राडा असणारं ‘बिग बॉस मराठी’चे सुसज्ज आलिशान घर, १०० दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास…फक्त आणि फक्त १५ दिवसांत सुरु होणार आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड प्रिमिअर २८ जुलैला रविवारी रात्री ९ वाजता फक्त ‘कलर्स मराठी’वर होणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तसंच जिओ सिनेमा या अ‍ॅपवर भाग प्रदर्शित होणार आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नाचा खर्च ऐकून व्हाल थक्क!

‘बिग बॉस मराठी ५’चा हा भन्नाट प्रोमो पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अखेर तारीख समोर आली”, “थँक्यू रितेश देशमुख”, “व्वा”, “खूप उत्सुक आहोत”, “रितेश दादा कल्ला होणार…बरोबर वाजणार”,“कडक”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटलेल्या पाहायला मिळतायत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img