7.7 C
New York

Anant and Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी अँटिलियावर पार पडली ‘अशी’ शिव शक्ती पूजा

Published:

Anant and Radhika Wedding: देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व नीता अंबानींच्या (Nita Ambani) लाडक्या मुलाच्या लग्नाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. अनंत अंबानी आज राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्नासाठी आता खास पाहुणे मंडळी मुंबईत दाखल होत आहे. वेगवेगळ्या देशातून पंतप्रधान, हॉलीवूड, बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकीय नेतेमंडळी मुंबईत अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी पोहोचले आहेत. अशातच लग्नाच्या आधल्या दिवशी अँटिलियावर पार पडलेल्या शिव शक्ती पूजेचा न पाहिलेला व्हिडीओ समोर आला आहे.

Anant and Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे बरेच कार्यक्रम झाले. त्यामधील एक कार्यक्रम म्हणजे शिव शक्ती पूजा जी बुधवारी १० जुलैला अँटिलिया बंगल्यावर शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेचे फोटो आणि व्हिडिओ बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, आता अंबानींच्या घरी पार पडलेल्या शिव शक्ती पूजेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. शिव शक्ती पूजेचा व्हिडिओ ‘बॉलीवूड नाउ’ या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

Anant and Radhika Wedding: या व्हिडिओमध्ये, संपूर्ण अंबानी फॅमिलीसह पाहुणे मंडळी शिव शक्ती पूजा करताना तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य होम, आरती, शिवलिंगावर अभिषेक करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे हर हर महादेवचा जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. अंबानी कुटुंबाचा हा पूजेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

रणबीरनंतर आता विकी कौशलसोबत तृप्ती डिमरीचा ‘हॉट अँड बोल्ड’ जलवा, नेटकरी संतापले…

शिव शक्ती पूजा का केली जाते?
दरम्यान, असं म्हटलं जात की, लग्नाआधी शिव शक्ती पूजा केल्याने वधू-वरांच्या जीवनात आनंद येतो. त्यांना भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय नवग्रह शांत होतात आणि जीवन सुखी होते. धार्मिक ग्रंथानुसार सीतेने रामायणामध्ये लग्नाआधी शिव आणि पार्वतीची पूजा केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राधिका-अनंतच लग्न आज दुपारी ३ वाजता शुभमुहूर्तावर होणार आहे. यानंतर १३ जुलैला सायंकाळी आशीर्वाद समांरभ होणार आहेत. या कार्यक्रमाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानंतर १४ जुलैला ग्रँड रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला बॉलीवूड इंडस्ट्रीसह मीडियाला आमंत्रित करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img