23.1 C
New York

MLC Election : अनिल देशमुखांचा भाजपवर हल्लाबोल

Published:

मुंबई

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 तारीख करिता आज विधानभवन पार (MLC Election) पडत आहे. या निवडणुकीमध्ये महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) अशी लढत असणार आहे. महायुती 9 तर महाविकास आघाडी कडून 3 उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे (BJP) तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये याकरिता काँग्रेसच्या (Congress) वतीने निवडणूक अधिकाऱ्यांना (Election Officers) पत्र दिले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी तुरुंगात असताना मला मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. पण आज होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी परवानगी मागितली आणि कोर्टाने त्यांना परवानगी दिलीही. एका आमदाराला एक न्याय आणि दुसऱ्या आमदाराला वेगळा न्याय का? त्यांनाही परवानगी नाकारली पाहिजे होती. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत असून पोलीस स्थानकात गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली असून अनिल देशमुख, नवाब मलिक यांना एक न्याय आणि गणपत गायकवाड यांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महायुतीला 11 पैकी 10 जागा जिंकणे सोपे आहे, परंतु क्रॉस व्होटिंग झाले तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. शरद पवार यांच्याकडे 12 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 तर काँग्रेसकडे 38 आमदार आहेत. या 12 उमेदवारांपैकी भाजपचे पाच उमेदवार सुरक्षित वाटतात, ते म्हणजे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर. महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा 1 उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव सहज विजयी होऊ शकतात. जयंत पाटील यांना जिंकायचे असेल तर त्यांच्यासाठी मतांचे व्यवस्थापन करावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img