मुंबई
लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Elections) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections) तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. या अनुषंगाने आज विधानपरिषदेत 11 जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले होते. 12 आमदार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे कुणाचा उमेदवार पराभूत होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले होते. मात्र आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीमध्ये महायुतीने (Mahayuti) बाजी मारली आहे. महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) 3 उमेदवारांपैकी 1 उमेदवार विजयी झाला आहे. तर दुसरे ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना 22 मतं मिळाली असून अध्याप त्यांना विजयासाठी 1 मत आवश्यक आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसचे सात ते आठ मत फुटले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा थोडासा का होईना वचपा महायुतीने काढल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये भाजपाचे सदाभाऊ खोत वगळता इथर चारही उमेदवार जिंकले आहेत. शिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकून आले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव जिंकल्या असून मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी एका मताची गरज आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असणारे शेकापचे जयंत पाटील यांना 12 च मतं मिळाली असून सदाभाऊ खोत किंवा जयंत पाटील यांच्यापैकी एकाचा पराभव होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे कृपाल तृमाने, भावना गवळी आणि अजितदादा गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे उमेदवारही विजयी झाले आहेत.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची एकूण ८ मतं फुटल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा पहायला मिळाला. शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही. उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलेलं नाही.
महायुतीचे उमेदवार
भाजपा
पंकजा मुंडे – २६ (विजयी)
परिणय फुके – २६ (विजयी)
योगेश टिळेकर – २६ (विजयी)
अमित गोरखे – २६ (विजयी)
सदाभाऊ खोत – २६ (विजयी)
शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी – २४ (विजयी)
कृपाल तुमाने – २५ (विजयी)
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर – २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस
प्रज्ञा सातव – २५ (विजयी)
शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर – २२
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) – 12